वेडिंग फॅशनमध्ये इन असलेली 'गोटापट्टी ज्वेलरी'

वृंदा चांदोरकर
बुधवार, 30 मे 2018

सध्या लग्नाचा सिझन आहे. अशा वेळी प्रत्येकालाच काहितरी हटके स्टाईल करायची असते. त्यातही आपला ट्रडिशनल लूक जपायचा असतो. त्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये आहे 'गोटापट्टी ज्वेलरी'. गोटापट्टी वर्क हे मुळे राजस्थानचे. साडीवर किंवा घागऱ्यावर हे वर्क केले जाते. आता हा पॅटर्न ज्वेलरीमध्ये आल्याने तुमच्या ट्रडिशनल आऊटफिट बरोबर ही गोटापट्टी ज्वेलरी उठून दिसते. 

गोल्डन किंवा सिल्व्हर 'लेस'चा वापर करुन ही ज्वेलरी तयार केली जाते. कापडावर या लेसचे पॅटर्न करुन त्याचे काठ वेगवेगळ्या रंगांच्या दोऱ्यांनी शिवले जातात.  आता यामध्ये कुंदन, मोती, किंवा गोंडे वापरुन फ्युजन करण्याचीही फॅशन आली आहे. त्यामुळे तुमची साडी किंवा ड्रेस साधी असेल तरी ज्वेलरीमुळे त्याला हेवी लूक मिळतो. शिवाय ही ज्वेलरी वजनालाही अतिशय हलकी असते. त्यामुळे सध्याच्या समर सिझनसाठी ही ज्वेलरी बेस्ट आहे.

याप्रकारच्या ज्वेलरीमध्ये कानातल्यांपासून ते संपूर्ण ब्रायडलसेट देखील उपलब्ध आहे. लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, गोल्डन, सिल्वर अशा ट्रॅडिशनल रंगांमध्ये ही ज्वेलरी पहायला मिळेल. असे असले तरी एखाद्या इंडो-वेस्टर्न ड्रेस बरोबरही ही ज्वेलरी घालायला काहीच हरकत नाही.

ऑनलाईन साईट्सवर किंवा काही फेसबुक पेज वरुन ही ज्वेलरी खरेदी करता येईल. साधारण शंभर रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत या ज्वेलरीची रेंज आहे. 

संबंधित बातम्या