'देवा'शी अतरंगी गप्पा

शनिवार, 30 डिसेंबर 2017

'देवा..एक अतरंगी' या चित्रपटाच्या टीमने 'ई सकाळ'शी गप्पा मारल्या. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली आहे. 

सकारात्मकतेने कशा प्रकारे तुम्ही लोकांची मनं जिंकु शकता याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 'या चित्रपटात प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राइज आहेत, म्हणून हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल', असा विश्वास अंकुश चौधरी याने व्यक्त केला. तर 'तुम्हांला जे आयुष्य मिळालंय ते साजरं करण्याची एक तऱ्हा आहे. ही तऱ्हा तुम्हाला या चित्रपटातून नक्की अनुभवायला मिळेल', असे तेजस्विनी पंडित म्हणाली.   

<p>'देवा..एक अतरंगी' या चित्रपटाच्या टीमने 'ई सकाळ'शी गप्पा मारल्या. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली आहे.&nbsp;</p> <p>सकारात्मकतेने कशा प्रकारे तुम्ही लोकांची मनं जिंकु शकता याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 'या चित्रपटात प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राइज आहेत, म्हणून हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल', असा विश्वास अंकुश चौधरी याने व्यक्त केला. तर 'तुम्हांला जे आयुष्य मिळालंय ते साजरं करण्याची एक तऱ्हा आहे. ही तऱ्हा तुम्हाला या चित्रपटातून नक्की अनुभवायला मिळेल', असे तेजस्विनी पंडित म्हणाली. &nbsp;&nbsp;</p> <p>या कलाकारांशिवाय संगीतकार अमितराज आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक मुरली नल्लप्पा यांचं कामही उत्तम झालं आहे. संगीतकार अमितराज यांनी चित्रपटाला दिलेले संगीत खुप गाजत आहे. देवाचे अँथम साँन्ग सध्या चर्चेत आहे. 'देवा' या गाण्यावर प्रेक्षक आपापली डान्स स्टेप असलेले व्हिडिओ अपलोड करत आहेत. शिवाय, 'रोज रोज नव्याने' हे मेलोडी गाणंही लोकांच्या पसंतीस पडत आहे. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. दिग्दर्शक मुरली नल्लप्पा यांचा हा मराठीतील तिसरा प्रयोग असला तरी 'मराठी लोक चित्रपटाच्या बाबतीत खुप प्रयोगशील असतात आणि अशा प्रयोगांना आनंदाने प्रतिक्रिया देतात', असे मत व्यक्त केले.</p>