डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगमध्ये या गोष्टी असाव्या

वृंदा चांदोरकर
मंगळवार, 17 जुलै 2018

आपल्या बाळासाठीचं शॉपिंग करणं म्हणजे होणाऱ्या आई बाबांना याबाबत खूपच एक्साईटमेंट असते. त्यामुळे काय घेऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे बऱ्याचदा भरमसाठ गोष्टी घेतल्या जातात. आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही.

अगदी हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय असावं ते पहिल्या काही क्रिटिकल महिन्यांसाठीची तयारी मी पण केली होती. पण त्यासाठी माझ्या मैत्रिणिंची मला खूपच मदत झाली. त्यामुळे मी, नक्की मला काय लागणार आहे. हे ठरवलं आणि तेवढ्याच वस्तु आणल्या. ही लिस्ट कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल.

- हॉस्पिटल बॅग तुमच्यासाठी - फिडिंग गाऊन किंवा तुम्हाला कंफरटेबल असतील असे कपडे, फिडिंग पिलो, सॅनिटरी पॅड्स, रोज लागणारे सामान ( पेस्ट, ब्रश, कंगवा, तेल, शॅम्पू इ..) , सॉक्स, स्लिपर्स, ब्रेस्ट पॅड्स, डिस्पोजेबल अंडरवेअर्स, हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी लागणारा कपड्यांचा जोड, तुमच्यासाठी स्वेटर ई. 

- या व्यतिरिक्त कॉर्ड सेल्स सेव्हिंग करणार असाल तर त्याचं किट

- बाळाचे सामान - बाळासाठी कपडे - हल्ली काही हॉस्पिटलमध्ये बाळ झाल्या झाल्या त्यांनी दिलेले कपडे घालतात. पण मला हे कपडे घरुन आणायला सांगितले होते. त्यामुळे त्याची तयारी मी नववा महिना सुरु झाला तेव्हाच केली होती. पूर्वी आपल्याकडे बाळ झाल्यावर त्याला जूने कपडे घालायची पद्धत होती. आता असं राहिलेलं नाहीए. आणि बाजारात छान छान कपडे मिळतातही..त्यामुळे ते घेण्याचा मोह टाळणे खरचं अवघड असतं. पण मी मला मिळालेले जूने कपडे माझ्या बालासाठी अगदी आवडीने वापरले..(जूने कपडे वापरुन मऊ झालेले असतात. सुरुवातिच्या काळात बाळाची स्किन अगदी नाजूक असताना हे कपडे बाळाला वापरायला छान असतात) हा अनुभवी सल्ला मी लक्षात ठेवला होता. 

नॉर्मल किंवा सी सेक्शन काहीही असलं तरी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये असतात. त्यामुळे मी 6 कपड्यांचे जोड बरोबर ठेवले होते. त्याबरोबर साधारणता: 2 डझन लंगोट (कॉटन नॅपिज हा त्याला फॅन्सी शब्द) बरोबर ठेवले होते. आणि जून्या साड्यांची शिवलेली भरपूर दुपटी..एक छोटं ब्लॅंकेट एवढं पुरेसं होत असं मला वाटलं. तीन स्वेटरचे सेट, टोपडी, मिटन्स, लाळेरी अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी.

-तसंच हॅण्ड सॅनिटायझर किंवा अँटी बॅक्टेरिअल वाईप्स, डेटॉल

-इतर वस्तू - बाळासाठी नेक पिलो, दोन लोड (असा सेट मिळतो). कोणाकडे असेल तर तो वापरण्यापुरता घ्या. कारण त्याचा उपयोग काही दिवसच होतो. वाईप्स, थोडे डायपर्स असेही मी बरोबर ठेवले होते.

हॉस्पिटलमध्ये लागणार नसले तरी बेबी सोप, शॅम्पू, ऑईल, लोशन, पावडर, पावडर पफ आणि बॉक्स, टॉवेल हे देखील मी आधिच खरेदी करुन ठवलं होतं.

संबंधित बातम्या