फॅशन विथ लिटील

शिवानी खोरगडे
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

फॅशनचे अनेक फंडे आज आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या रूपाने आकर्षित करत असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने यासाठी कारण, फॅशन म्हटली की फक्त कपडे किंवा दागिने एवढ्यापुरतीच ती मर्यादित नाही, हे आता सगळ्यांनाच उमगले असावे. कॉलेज, ऑफिस, पार्टी, डेट, सण-समारंभ अशा अनेक जागी आपण जातो, तेव्हा प्रत्येक जागेच्या मूडनुसार आपल्यालाही तेथे शोभेल असा पेहराव करण्याची, तसा ॲटिट्यूड मेंटेन करण्याची इच्छा असते. आपण परिधान केलेला पेहराव तर असा ॲटिट्यूड राखण्यात मदत करतोच यात शंका नाही; पण बऱ्याच अशा लहान-लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला या ॲटिट्यूडसोबत कम्फर्टेबल करतात आणि आत्मविश्वास देतात.

फॅशनचे अनेक फंडे आज आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या रूपाने आकर्षित करत असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने यासाठी कारण, फॅशन म्हटली की फक्त कपडे किंवा दागिने एवढ्यापुरतीच ती मर्यादित नाही, हे आता सगळ्यांनाच उमगले असावे. कॉलेज, ऑफिस, पार्टी, डेट, सण-समारंभ अशा अनेक जागी आपण जातो, तेव्हा प्रत्येक जागेच्या मूडनुसार आपल्यालाही तेथे शोभेल असा पेहराव करण्याची, तसा ॲटिट्यूड मेंटेन करण्याची इच्छा असते. आपण परिधान केलेला पेहराव तर असा ॲटिट्यूड राखण्यात मदत करतोच यात शंका नाही; पण बऱ्याच अशा लहान-लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला या ॲटिट्यूडसोबत कम्फर्टेबल करतात आणि आत्मविश्वास देतात. केलेली फॅशन जर आपण तेवढ्या आत्मविश्वासाने सांभाळू शकलो तरच ती चार लोकांच्या नजरेत वाह-वाह मिळवते.

फॅशन करताना अनेक लहान-लहान गोष्टी ज्याविषयी आपल्याला कुणालाही काही विचारायची गरज पडत नाही आणि आपल्या लूकला आपणच फॅशन आणि आत्मविश्वासाची जोड देऊ शकतो. या गोष्टी कोणत्या तर ते सांगितलंय आपल्यापैकीच काही मैत्रिणींनी. 

फॅशन डिझायनिंग शिकत असलेली शिवानी मनकुसकर सांगते, आजकाल हेवी इअर रिंग्ज आणि पोनीटेल हेअर स्टाइलची चलती आहे. धावपळीच्या जीवनात झटक्‍यात फॅशनचा हा खूप कूल फंडा आहे. दुसरा कोणताही दागिना न घालता फक्त हेवी इअर रिंग्ज घातल्यास दागिने घातल्याची हौसही पूर्ण होते आणि केवळ हेवी इअर रिंग्ज परिधान करण्याचा फंडा पारंपरिक, वेर्स्टन, फ्युजन अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर शोभणाराच आहे.

फक्त कपड्यांच्या प्रकाराप्रमाणे, म्हणजे कपड्याला काठ असतील, तर त्यावर मोती, कुंदन, गोल्ड, कॉपर असलेले हेवी इअर रिंग्ज घालावे, तर सिल्क, शिफॉन, पॉलिस्टर इत्यादी गुळगुळीत प्रकारच्या कपड्यांवर स्टोन, सिल्वर असलेले हेवी इअर रिंग्ज जास्तं शोभतील. फॅशन डिझायनर म्हणून काम करणारी रसिका देहाणकरच्या मते, मिसमॅचची फॅशन फॉलो करायला एकदम सोपी आहे. रोज तेच ते कपडे आणि त्यावरचे दागिने किंवा चप्पल याबाबतीत तरी किती प्रयोग करणार..! त्यापेक्षा सहसा पूर्ण पांढरा किंवा काळा रंगाचा कुर्ता बहुतेकींकडे असतोच. या कुर्त्याखाली कोणताही रंगीबेरंगी पैजामा, लाँग स्कर्ट घालता येईल. कोणत्याही अंगकाठीच्या मुलीला हे ड्रेसिंग शोभून दिसतं. गरज वाटल्यास आणि शोभत असल्यास एखादी कलरफुल प्लेन ओढणी वा स्टोल या ड्रेसवर घेता येईल. शिवाय, फॅशन आणि स्टाइल या दोन गोष्टींतील फरक आपल्याला कळायला पाहिजे. प्रत्येक फॅशन ही स्टाइल बनू शकत नाही. कारण, स्टाइल ही त्या-त्या व्यक्तीच्या स्वभाव, कल्चर, काम यातून विकसित झालेली असते. जी फॅशन सारखी नेहमी बदलत नाही. फॅशन डिझायनिंग होऊन स्वतःचं बुटीक चालवणारी प्राजक्ता डाहाळे हिला फॅशन करताना लक्षात ठेवून काही लहान-सहान गोष्टी केल्यात, तर ती फॅशन करणे यशस्वी होते असं वाटतं. जसे, लाइट कलर ड्रेसिंग करत असताना त्यावर केसांची कोणतीही स्टाइल मागे केस वळवून केली, तर अधिक छान दिसते. अशावेळी मस्कारा आणि लिपग्लॉस याशिवाय जास्तीचं मेकअप शक्‍यतो टाळावेत. मॅचिंगपेक्षा विरुद्ध रंगाचे शेड्‌स असलेल्या कपड्यांबाबतीत प्रयोग करायला आपल्याकडे जास्त पर्याय असतात.

ॲनिमल प्रिंटचे कपडे कधीच गडद रंग असलेल्या कपड्यांबरोबर मॅच करू नका. ज्या मुलींची किंवा महिलांची उंची कमी आहे. अशांनी नेहमी ड्रेसच्या बॉटमने वा फूटवेअरने टाचा झाकल्या जातील, याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्यांचे पाय लांब दिसतील. परफ्युम हा शक्‍यतो सौम्यच असावा. आपल्या फॅशनकडे आकर्षित करण्याचा परफ्युम हा मस्तं फंडा आहे. फॅशन डिझायनर अमृता रानडे हिच्या मतेसुद्धा बदलती फॅशन आणि ठरलेली स्टाइल यात गफलत करता कामा नये. दुसऱ्याला काय आवडेल किंवा मी कशी हटके दिसेल याचा विचार केल्यापेक्षा मला काय शोभेल तेच मी परिधान केलं पाहिजे. रेडिमेड कपड्यांच्या मागे धावू नका. फॅशन म्हणजे बाजारात उपलब्ध असलेले रेडिमेडच असतात, असं नाही, तर कापड विकत घेऊन किंवा घरच्या साड्यांचे कापड वापरून तुम्ही तुम्हांला शोभणारा पॅर्टन, डिझाइन क्रिएट करू शकता. कपडे आणि ज्वेलरी वापरताना दोनही गोष्टी भरभरून वापरू नका. सिंपल ड्रेसवर हेवी ज्वेलरी आणि हेवी ड्रेसवर सिंपल ज्वेलरी असा पेहराव तुम्हाला नेहमीच स्टायलिश लूक मिळवून देईल.

सेलिब्रेटी स्टायलिस्ट सायली बाबर सांगते, कोणतीही फॅशन करताना आपण कुठे जातोय, कधी जातोय हे लक्षात घेऊन त्या वेळी शोभतील त्या रंगाचे कपडे परिधान करावे. पेस्टल रंग, गडद रंग असलेले कपडे हे संध्याकाळ वा रात्रीच्या समारंभांना शोभून दिसतात. सध्या गडद पिवळा रंग ट्रेंडमध्ये आहे.

याशिवाय मिक्‍समॅच कलर ट्रेंडी झालंय. गडद गुलाबी किंवा केशरी वर हिरवा रंग मॅच होतो. पांढरा शर्ट आणि कलरफूल स्कर्ट, त्यावर लाँग नेकपीस अशी इतकी सहज जमणारी फॅशन करता येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही घालताय ते सांभाळायला जमणार आहे का? याकडे लक्ष द्या.

एकदाका ड्रेसअप होऊन बाहेर पडलं की बसता येत नाही, चालता येत नाही, सतत काही तरी खुपतंय अशा प्रकारचं ड्रेसिंग म्हणजे फॅशनचा बट्याबोळच म्हणू शकतो आपण. फॅशन ही नेहमी कम्फर्टेबलच असावी. कम्फर्टेबल नसेल तर ती फॅशन असू शकत नाही. त्याला आपण फॅशन डिझास्टर म्हणू. फॅशनचा जमाना आहे खरा; पण आवड आणि कम्फर्टेबल ड्रेसिंग यात मेळ घालता यायला जमलं तरच आत्मविश्वासाने येणारी फॅशन आपण आत्मसात करू शकतो. 

संबंधित बातम्या