पावसाळ्यात मुलांसाठी प्लॅन करा इंडोअर अॅक्टिव्हिटी...

अस्मिता कुलकर्णी- काळे
मंगळवार, 17 जुलै 2018

पावसाळ्यात लहान मुलांना पावसाची खुप मज्जा वाटते. खर तर पावसाळ्यात खुप गोष्टी घडतात जस की शाळा चालू होतात. नवीन स्कूल बॅग, नवीन वह्या, नवीन पुस्तकं, नवीन युनिफॉर्म, एवढंच काय नवीन मित्र मैत्रिणी सुद्धा... पण या गडबडीत एक गोष्ट होत असते ती म्हणजे पावसामुळे घराबाहेर जाऊन खेळता येत नाही. मग साहजिकच मुलं मोबाइल नाहीतर टिव्हि याकडे वळतात. त्यापेक्षा त्यांच्यायाठी इंडोअर अॅक्टिव्हिटी प्लॅन करता येतात.

यासाठी 'प्ले डेट' मस्त आसतात असं मला वाटतं. 'प्ले डेट' म्हणजे आपल्या मुलाच्या मित्र मैत्रिणिंना घरी बोलवून वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या. म्हणजे मुलांचा वेळही मस्त जातो

* 'प्ले डेट' - तुम्ही आपल्या मुलाच्या वयोगटातील मुलांना घरी बोलावून काही गेम्स खेळू शकता. त्यांच्या आवडीच्या किंवा educative / informative Movies प्लान करु शकता.या प्ले डेट आळी पाळीने प्रत्येकाच्या घरी करता येतात. याची जवाबदारी एका पालकाने घ्यायची. आणि त्यातील ऍक्टिव्हिटी, गेम्स, मुलांसाठी खाऊ या गोष्टी करता येतात.

* I spy - हा खेळ तुम्ही individually /group बरोबर खेळू शकता. यात एखादी गोष्ट/ खेळणं याच वर्णन सांगायचं. आणि मुलांनी ते ओळखायचं. हे ऑब्जेक्ट तुम्ही कश्या प्रकारचे आहे. त्याच्या qualities काय आहेत, कास दिसतं,... अस वर्णन करायचं त्याच नाव न सांगता.

* Sorting - हा खेळ खूप सोपा आहे. यात तुम्ही काही रंग, काही shapes, Same objects या गोष्टी मुलांना शिकवू शकता. उदाहरणार्थ वेगवेगळ्या आकाराची काही खेळणी एकत्र करावीत जस की त्रिकोण, चौकोन, गोल, आणि ती saperate करायला सांगायची, यात रंग पण 
ओळखता येतात. एका वाटीत/प्लेट मध्ये स्वयंपाक घरातील 2 किंवा 3 डाळी मिक्स करून त्या वेगळ्या करायला सांगणे. लहान मुलांना लिखाण नीट करता यावे यासाठी हा खेळ खूप उपयोगी ठरतो शिवाय मुलं concentrate करायलाही शिकतात.

* Keep the balloon up - या खेळात मुलांना फुगे फुगवून द्यावेत. अट फक्त एकच की फुगा जमिनीवर पडायला नको. हा खेळ मुलं खूप एंजॉय
करतात.

* Drop it correct - एक कार्ड बोर्ड घेऊन त्याचा गोल बनवायचा. किंवा tissue paper चा संपलेला रोल घेतला तरी चालेल. तो भिंतीला चिकटवा, आणि मुलांना काही वस्तू द्या उदा straw, marbles, जुन्या छोट्या पेन्सिल आणि या वस्तू भिंतीला लावलेल्या गोलातून ड्रॉप करायला सांगा. यात मुलांना कोणत्या आकाराची वस्तू त्यात मावते हे लक्षात येईल आणि मुल त्या प्रमाणे स्वतःच वस्तू निवडून त्यात टाकेल.

या शिवाय बरेच बोर्ड गेम्स बाजारात उपलब्ध आहेत जस की Jigsaw, Chess, सपशिडी Business/ व्यापार आपल्या मुलाच्या वयानुसार हे गेम्स मिळतात. अश्या प्रकारचे खेळ खेळुन मुलांना मोबाइल आणी tv पासूनलांब ठेवता येईल.

संबंधित बातम्या