आर्टिस्टीक डोकरा ज्वेलरी

वृंदा चांदोरकर
बुधवार, 23 जानेवारी 2019

धातुपासून ज्वेलरी बनविण्याची परंपरा आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. पितळ्यासारख्या दिसणाऱ्या धातुपासून तयार केलेली डोकरा ज्वेलरी सध्या फॅशनमध्ये आहे. विशेष म्हणजे ही ज्वेलरी 'मेंटेनन्स फ्री' आहे. कारण या धातुपासून बनविलेली ज्वेलरी काळी पडत नाही किंवा पाणी लागले तरी खराब होत नाही. 

या ज्वेलरीला चार हजार पासूनचा इतिहास आहे. मोहेंजादारो संस्कृतीमध्येही डोकरा ज्वेलरीचे अवशेष सापडले आहेत. मेटल कास्टिंग करुन या प्रकारची ज्वेलरी बनवितात. ज्वेलरीच नाही तर अनेक प्रकारचे आर्टिफॅक्स डोकरा पासून बनविले जातात.

सध्या या ज्वेलमध्ये मंगळसुत्राची चांगलीच फॅशन आहे. किंवा छोट्या मण्यांची माळ किंवा बांगड्या यांना पसंती मिळत आहे. तसेच हेवी डिझाईन्सपण यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे यात व्हरायटी खरेदी करता येते. ऑनलाईन ही ज्वेलरी खरेदी करता येईल. 

गोल्डन बेसमध्ये ही ज्वेलरी असते. त्यात बेगबेगळ्या प्रकारचे, रंगांचे बिड्स वापरुन किंवा कॉटन फॅब्रिकचा वापर करुन तयार केलेल्या अनेक डिझाईन्स बघायला मिळतील. तसेच मासा, त्रिकोण, गोल, कोयरी असे पारंपारिक आकार यामध्ये वापरले जातात. परंतु बोल्ड लूकमुळे साडी, ड्रेस, कुर्ती बरोबरच वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न आउटफिटवरही ही ज्वेलरी शोभुन दिसते.

संबंधित बातम्या