केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत 'निफ्टी' 11,000 वर? 

राजेंद्र सूर्यवंशी
बुधवार, 27 डिसेंबर 2017

गुजरातमधील विधानसभेच्या अपेक्षित निकालानंतर शेअर बाजार आता केंद्रीय अर्थसंकल्पाचा कानोसा घेत दिशा सुनिश्‍चित करीत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबरच बाजार डिसेंबर तिमाहीच्या निकालांचा अंदाज घेत वरच्याच दिशेने वाढण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदी व वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर आता उत्पादन व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे या तिमाहीतील निकालाबाबत बाजाराला अपेक्षा कमी; पण उत्कंठता जास्त असेल. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह या पुढेही व्याजदरात वाढ करणार हे निश्‍चित झाले आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने या बाजूनेदेखील बाजार दबावाखाली राहील.

गरज पडल्यास रिझर्व्ह बॅंक पुढील काळात व्याजदरवाढ पण करू शकते, हा धोकाही बाजार गृहीत धरून आहे. अशा परिस्थितीतही केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत 'निफ्टी' 11,000 अंशांचा टप्पा गाठण्याची शक्‍यता आहे. अर्थात केंद्रीय अर्थसंकल्प शेअर बाजाराच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करेलच, असे नाही. त्यामुळे 11,000 अंशांनंतर बाजारातील सर्वांत मोठे 'करेक्‍शन' (जे खूप दिवसांपासून बाकी आहे) सुरू होण्याची शक्‍यता राहील. जागतिक शेअर बाजारही यासाठी तयार होत आहेत. 
तांत्रिक कल कसा राहील? 

तांत्रिक आलेखानुसार 'निफ्टी'ला 10,505 अंश या मागील बंद पातळीच्या वरच्या दिशेने 10,550 अंशांवर मोठा अडथळा आहे. 10,505 अंशांच्या पातळीच्या खाली घसरल्यास 10,450 अंशांवर छोटा आधार असून, या खाली 10,340 अंशांवर मोठा आधार आहे. सध्या 'निफ्टी' 10,340 अंशांखाली व 10,550 अंशांवर लगेच जाण्याची शक्‍यता दिसत नाही. 10,550 अंशांची पातळी ओलांडून 'निफ्टी' वर निघाल्यास पुढे 11,000 अंश हे लक्ष्य असेल. 11,000 अंशांचे लक्ष्य येत्या केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 'बॅंक निफ्टी'साठी वरच्या बाजूला 26,000 अंश व खालच्या बाजूला 25,550 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. 
खरेदी करण्यासारखे..... 

यूफ्लेक्‍स लिमिटेड (सध्याचा भाव : रु. 495, उद्दिष्ट : रु. 750) 

पॅकेजिंग क्षेत्रातील 3474 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली देशातील ही एक सर्वांत मोठी कंपनी आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात या कंपनीचा व्यवसायविस्तार आहे. रोजच्या वापरातील वस्तूंना बाजारात विक्री करण्यायोग्य आवरण बनविण्यापासून ते मोठमोठ्या वस्तू व अवजड यंत्रसामग्रीला स्थलांतरित व विक्री करण्यासाठी पॅकिंग साहित्य बनविण्याचे काम ही कंपनी करते. कंपनीचा निरंतर विस्तार होत असून, विक्रीतून मिळणारा महसूल व त्यावर मिळणारा निव्वळ नफा व नफ्याचे प्रमाण सतत वाढते आहे. डिसेंबर 2014 मध्ये प्रतिशेअर पुस्तकी मूल्य 87 होते, आज ते 530 आहे. पुढील काळातही याच गतीने कंपनीला नफा मिळण्याची शक्‍यता आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम वेळ असून, इतर गुणोत्तरीय प्रमाणे उत्तम पातळीवर आहेत. या उद्योगाचा पीई 44 असताना या कंपनीचा पीई 9.81 आहे. पीबीव्ही 1.7 आहे. पुढील एक वर्षासाठी गुंतवणूक ठेवल्यास 50 टक्के परतावा मिळण्याची शक्‍यता आहे. 

(डिस्क्‍लेमर : लेखक शेअर बाजाराचे संशोधन-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी 'सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

संबंधित बातम्या