मौका है मौका!

रितेश मुथियान, श्रीनिवास जाखोटिया 
बुधवार, 27 डिसेंबर 2017

गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी 3 ते 4 वर्षे मनात ठेवूनच गुंतवणूक करावी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजार हा नकारात्मकता पचवू शकतो; परंतु अनिश्‍चितता नाही. गुजरातमधील निवडणूक व त्याचे होणारे दूरगामी परिणाम यामुळे बाजारात असलेली अनिश्‍चितता आता संपली आहे.

गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी 3 ते 4 वर्षे मनात ठेवूनच गुंतवणूक करावी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजार हा नकारात्मकता पचवू शकतो; परंतु अनिश्‍चितता नाही. गुजरातमधील निवडणूक व त्याचे होणारे दूरगामी परिणाम यामुळे बाजारात असलेली अनिश्‍चितता आता संपली आहे. विविध राजकीय विश्‍लेषक त्यांच्या परीने या निकालांचे विश्‍लेषण करतीलच; परंतु हा विजय बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे व गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आश्वासक असा आहे. त्यामुळे अशी संधी साधून आपल्यासमोर दोन शेअर मांडत आहोत. त्यात अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक फलदायी होऊ शकते, असे आम्हाला वाटते. 

1) डीएलएफ लि. (सध्याचे मार्केट कॅप : रु. 41,300 कोटी, सध्याचा भाव : रु. 232) 
भारतातील ही सर्वांत मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनीत प्रवर्तकांचा 75 टक्के हिस्सा आहे. सध्याचा भाव हा पुस्तकी मूल्याच्या 2.81 पट आहे. येणाऱ्या काही वर्षांत कंपनी आपल्यावरील कर्जाचे ओझे मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे, ज्याचे फलित कंपनीच्या पुढील तीन वर्षांत येणाऱ्या निकालांमधून निश्‍चितच दिसू शकेल. 

2) कॅपॅसिटी इन्फ्रा (सध्याचे मार्केट कॅप : रु. 2671 कोटी, सध्याचे भाव : रु. 394) 
शेअर बाजारात नुकत्याच "लिस्ट' झालेल्या या कंपनीत प्रवर्तकांचा जवळजवळ 44 टक्के हिस्सा आहे. कंपनीकडे सध्या रु. 5200 कोटींच्या ऑर्डर आहेत. वार्षिक उलाढाल साधारणपणे रु. 1200-1400 कोटींच्या घरात आहे. कंपनीची मागील सातत्यपूर्ण कामगिरी बघता येणाऱ्या काळात कंपनीचे निकाल चांगले लागतील, अशी अपेक्षा आहे. कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत भारतीय रिअल इस्टेटमधील प्रतिष्ठित नावे आहेत आणि येणाऱ्या काळात कंपनी आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत नेईल, अशी अपेक्षा आहे. 
त्यामुळे शेअर बाजाराने दिलेला हा "मौका' साधून दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा. 

(डिस्क्‍लेमर : लेखकद्वय "इक्विबुल्स'चे संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

संबंधित बातम्या