किचन केमिस्ट्री - ऐन पावसात बटाट्याचा गरम रस्सा
दिवस सुटीचा आहे. खिडकीच्या बाहेर जोरदार पाऊस पडत आहे. अशा वेळी तव्यावर फुगलेले गरम फुलके थेट पानात पडावेत आणि आपण वाफारलेल्या बटाट्याच्या रश्शाचा आस्वाद घ्यावा, हे नानांचं "स्वप्न' आहे. वहिनी ते नेहमी सत्यात आणतात. त्यांच्या चौकोनी कुटुंबातील रस्सा बहुढंगी असतो. कारण नानांना बटाट्याची साल चालत नाही आणि मोठे तुकडे लागतात. कन्येला साल चालेल, पण तिखटपणा नाही. चिरंजीवांना बटाटा सालासकट पाहिजे, पण तुकडे छोटे! वहिनी मात्र रस्सा असेल तसा "गोड' मानून मजेत आस्वाद घेतात. साहजिकच त्या रस्सा करताना काही बटाटे सालासकट घेतात, तर काही सालाविना. काही तुकडे मोठे, काही लहान!

आता प्रश्न पडतो, बटाटा सालासह खावा की नाही? आहारतज्ज्ञाच्या मते बटाटा सालीसह खावा. सालीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे तंतुमय घटक ( "कॉम्प्लेक्स' कर्बोदके) असतात. त्यातील स्टार्च, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, मॅनान, गॅलॅक्टान आदी आहारात महत्त्वाची आहेत. बटाट्याच्या सालीजवळ रिबोफ्लॅविन (बी-2), नायसिन (बी-3) आणि पिरिडॉक्झिन (बी-6) ही जीवनसत्त्वे असतात. शिवाय लोह, कॅल्शियम, पोट्यॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजद्रव्ये व प्रोटीन तीन टक्के आहे. शरीरातील अपायकारक रसायने निष्प्रभ व्हावीत म्हणून पॉलिफेनॉल वर्गीय अँटिऑक्सिडंट सालीमध्ये आहेत. थोडक्यात म्हणजे बटाट्याच्या सालीमध्ये पौष्टिक पदार्थ आहेत; मग आपण त्याची सालपटं काढण्यात का वेळ घालवावा?